महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून राज्यात मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे. आता महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कुठे किती मतदान झाले, याची आकडेवारी समोर आली आहे.
मुंबई शहरात सकाळी ९ वाजेपर्यंत 6.25 टक्के मतदान झाले आहे. यात सर्वाधिक ८.३१ टक्के मतदान हे मलबार हिल मतदारसंघात झाले आहे. तर धारावी मतदारसंघात सर्वात कमी ४.७१ टक्के मतदान झाले आहे. धारावीत 4.71 टक्के, सायन-कोळीवाडा: 6.52 टक्के, वडाळा 6.44 टक्के, माहीम: 8.14 टक्के, वरळी: 3.78 टक्के, शिवडी : ६.१२ टक्के, भायखळा: 7.09 टक्के, मलबार हिल: 8.31 टक्के, मुंबादेवी 6.34 टक्के आणि कुलाबा: 5.35 टक्के मतदान झाले आहे.