Published on
:
21 Nov 2024, 10:04 am
Updated on
:
21 Nov 2024, 10:04 am
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात बुधवारी झालेल्या मतदानानंतर २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६६.५७ टक्के मतदान झाले होते. अनेक मतदान केंद्रांवर सहा वाजेनंतर मतदानासाठी रांगा लागल्याने मतदानांची टक्केवारी ७० टक्क्यांच्यावर जाण्याचा अंदाज आहे.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये प्रमुख लडत होत असल्याचे चित्र आहे, ऐन वेळी दोन्हीही पक्षांत झालेल्या बंडखोरीमुळे अपक्ष उमेदवारासह वंचितने देखील उमेदवार दिल्याने पंचरंगी लढत झाली आहे. यामुळे कोणाला बहुमताचा कौल मिळणार हे आता मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे डॉ. हिकमत उढाण व महाविकास आघाडीचे राजेश टोपे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. अपक्ष उमेदवार सतीश घाटगे यांच्यासह अपक्ष उमेदवार शिवाजी चोथे व वंचितचे उमेदवार काबेरीताई खटके यांच्यासह २३ उमेदवारांचे मतदानानंतर राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
कुणाला बहुमताचा कौल मिळाला, हे आता मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. अंबड तालुक्यातील ५३ गावे घनसांवगी तालुक्यातील ११७ गावे जालना तालुक्यातील ४२ गावे असा २१२ गावांचा समावेश आहे. मतदार संघात सकाळपासून मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. कापूस वेचणीसह रब्बीतील कामे सुरू असताना देखील मतदारांचा मोठा उत्साह असल्याने अनेक केंद्रांवर सकाळी पावणे सात वाजेपासून मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती ३ लाख ३० हजार २९१ मतदारांपैकी १लाख ७१ हजार २८१ पुरुष तर १ लाख ५९ हजार ००९ स्त्री मतदार आहेत. सार्यकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ११ हजार ४२२ तर १ लाख ८ हजार ४४७ अशा २ लाख १९ हजार ८६९ मतदारांनी मतदानाचा हक बजावला. त्याची पाचवाजेपर्यंतची टक्केवारी ६५:०६% झाली होती. दिव्यांगांना मतदान करता यावे यासाठी व्हील चेअरची सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली होती.
सेल्फी पॉइंटचे आकर्षण
सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात असल्याने ही निवडणूक वेगळी आहे. कोण बिजयी होणार या प्रश्नांचे उत्तरं २३ नोव्हेंबरला निवडणुकीच्या निकालानंतर मिळणार आहे. मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे पुरुष युबक युवती व महिलांना विशेष आकर्षण दिसून आले. महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानाच्चा एक बजावत सेल्फी घेतला नवमतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला.