Published on
:
19 Nov 2024, 12:20 pm
लातूर, पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी सकाळी ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. १०६ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत मतदान प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा, पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपला मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपला असून या कालावधीनंतर आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी भरारी पथके, स्थिर निगारणी पथके अधिक गतीने कार्यरत करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ हजार १४२ मतदान केंद्र आणि १ सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून बासाठी २ हजार ३८३ मतदान पथके सन्य करण्यात आली आहेत. पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, प्रथमस्तरीय मतदान केंद्र अधिकारी आणि दोन इतर मतदान केंद्र अधिकारी पांचा समावेश असून एकूण ९ हजार ५३४ अधिकारी, कर्मचारी वा मतदान पथकांमध्ये राहतील. यासोबतच पोलिस, गृहरक्षक दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) उपलब्ध राहणार आहेत. तसेच प्रथमोपचार कीटसह एक आरोग्य कमर्चारी यांचीही मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, व्हीलचेअर, सावलीसाठी मंडप, चयोवृद्ध, गरोदर महिला यांना बसण्यासाठी खुर्ची यासारख्या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक युवा संचलित मतदान केंद्र, दिव्यांग संचलित मतदान केंद्र, महिला संचलित मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. यासोबत प्रत्येक मतदारसंघात एक अभिनव मतदान केंद्र (युनिक पोलिंग स्टेशन) तयार करण्यात आले आहे. वयोवृद्ध मतदार, गरोदर महिला यांना रांगेत न करता प्रथम प्राधान्याने प्रवेश देवून त्यांचे मतदान करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले, निवडणूक, मतदानविषयक ठक्रारींसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून या कक्षाचा संपर्क क्रमांक ०२३८२- २२४४७७ आहे.
कडेकोट बंदोबस्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान शांततेत पार पडण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये १३९ पोलीस अधिकारी ४ हजार ४३० पोलिस अंमलदार, होमगार्ड आणि केंद्रीय सशस्त्र दलाच्या ६ तुकड्या आणि एक राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात करण्णात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेत गुन्हेगारांकडून कोणताही व्यत्यय येवू नये, यासाठी ३ हजार १७९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्पात आली आहे. यामध्ये ६ जण तडीपार आणि ४ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत ४२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ३७ लाख रुपयांचे मद्य, ४७ लाख रुपये किंमतीचा गांजा जम केल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले. तसेच मतदारांना कोणतीही तक्रार असल्यास ११२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोबाईल वापरावर बंदी, जमावबंदी लागू
विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, त्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉईलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंध करण्यात आला आहे.