Published on
:
20 Nov 2024, 4:00 am
Updated on
:
20 Nov 2024, 4:00 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध लढणारा युगेंद्र पवार हा नवखा आहे. प्रचार सभेत ते माझ्यावर अन्याय झाला म्हणत असतील, तर नेमका अन्याय कसा झाला, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार यांनी बारामतीमध्ये प्रचार सांगता सभेत एक पत्र वाचून दाखवलं. या पत्रात अजित पवारांवर अन्याय झाल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ते सत्तेत होते. सत्ता त्यांच्या ताब्यात होती. मग त्यांच्यावर अन्याय कोणी केला? त्यांच्याविरूद्ध लढलेला उमेदवार युगेंद्र पवार नवखा आहे. त्यामुळे अन्याय नेमका कोणी केला? असा सवाल त्यांनी केला.
अजित पवार २७० जागा येणार असेही म्हणतील...
महायुतीला १७५ जागा मिळतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, त्यांना ते २७० जागा मिळतील असे का म्हणालेनाहीत निवडणूकीत कीती जागा येतील हे सांगायला मी ज्योतिषी नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.
शरद पवारांचे मतदारांना आवाहन
महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. नाकरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
#WATCH | Baramati: After casting his vote, NCP-SCP chief Sharad Pawar says, "People should vote and I am confident that people of Maharashtra will vote in large numbers in a peaceful manner. After 23 November, it will be clear who will be given the responsibility of forming the… pic.twitter.com/wVClQiHjAY
— ANI (@ANI) November 20, 2024