चंद्रपुरात ६० लाखांची रोकड जप्तfile photo
Published on
:
20 Nov 2024, 5:58 am
Updated on
:
20 Nov 2024, 5:58 am
चंद्रपूर : राजूरा विधानसभा क्षेत्रातील कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात आज पहाटे ६० लाखांची रोकड जप्त करण्यात आली. सोबतच प्रचार साहित्यही जप्त करण्यात आले. पहाटेच्या सुमारास ही कारवाई फ्लाईंग सर्वेलन्स टिमने केली आहे. रोकड जप्त करण्यात आल्याने मतदारांमध्ये पैसे वाटण्याचा डाव उधळून लावण्यात आला आहे. वृत्तलिहीपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई सुरू आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा विधानसभा मतदार संघात गडचांदूर शहरातील एका घरामध्ये रोकड असल्याची माहिती स्थानिक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरुण निमजे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी गडचांदूर शहरातील त्या घरामध्ये जाऊन तपासणी केली असता त्यामध्ये ६० लाखाची रोकड आढळून आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रोकड जप्त केली आहे. रोकड कुणी आणली, याबाबत निवडणूक विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. वृत्तलिहिपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.