Published on
:
19 Nov 2024, 8:11 am
Updated on
:
19 Nov 2024, 8:11 am
रायगड | मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, मतदारांना मतदानाकरिता आकषीर्र्त करण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे विशेष मतदान केंद्रांचे नियोजन केले आहे. यामध्ये महिला संचलीत 9 मतदान केंद्रे, युवा संचलित 8 मतदान केंद्रे, दिव्यांग संचलीत 6 मतदान केेंद्रे आणि 7 आदर्श मतदान केंद्र राहाणार आहेत.
जिल्ह्यात 9 महिला नियंत्रित मतदान केंद्र (सखी) स्थापन करण्यात येणार आहेत.त्यात पनवेलमध्ये मतदान केंद्र क्र.117- खारघर, कर्जतमध्ये मतदान केंद्र क्र.286-खोपोली,उरणमध्ये मतदान केंद्र क्र.267- उरण,पेणमध्ये मतदान केंद्र क्र.236-तिवरे व मतदान केंद्र क्र.265 आंबोले,मतदान केंद्र क्र.364- कोलाड, अलिबागमध्ये मतदान केंद्र क्र.182-अलिबाग,श्रीवर्धन मध्ये मतदान केंद्र क्र.167-उतेखोल आणि महाड मध्ये मतदान केंद्र क्र.230- महाड अशी एकूण 9 सखी मतदार केंद्र असतील. निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह या केंद्रांमध्ये तैनात पोलिस कर्मचारी देखील महिला असतील.
जिल्ह्यात 8 युवा संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.त्यात पनवेलमध्ये मतदान केंद्र क्र.118-खारघर, कर्जतमध्ये मतदान केंद्र क्र.290-खोपोली,उरणमध्ये मतदान केंद्र क्र.256-उरण व 96-हाशाची वाडी , पेणमध्ये मतदान केंद्र क्र.284-नागोठणे, अलिबागमध्ये मतदान केंद्र क्र.178-अलिबाग, श्रीवर्धन मध्ये मतदान केंद्र क्र.96-तळा,महाड मध्ये मतदान केंद्र क्र.182-मोहोप्रे असे एकूण 8 युवा संचालित मतदार केंद्र असतील.
दिव्यांग मतदारांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात 6 दिव्यांग संचलित मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.त्यात कर्जतमध्ये मतदान केंद्र क्र.81-आनंदवाडी, उरणमध्ये मतदान केंद्र क्र.-127 जासाई ,पेणमध्ये मतदान केंद्र क्र.99-पेण नगर परिषद, अलिबागमध्ये मतदान केंद्र क्र.179-अलिबाग,श्रीवर्धन मध्ये मतदान केंद्र क्र.257-म्हसळा, आणि महाड मध्ये मतदान केंद्र क्र.95-गोरेगाव असे एकूण 6 दिव्यांग संचालित मतदार केंद्र असतील. जिल्ह्यात 7 आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यात पनवेलमध्ये मतदान केंद्र क्र.119-खारघर,उरणमध्ये मतदान केंद्र क्र.299 -बांधपाडा/कचरे पाडा,पेणमध्ये मतदान केंद्र क्र.34 बळवली, अलिबागमध्ये मतदान केंद्र क्र.172-अलिबाग, श्रीवर्धन मध्ये मतदान केंद्र क्र.318-श्रीवर्धन,आणि महाड मध्ये मतदान केंद्र क्र.338 पार्ले असे एकूण 7 आदर्श संचालित मतदार केंद्र राहाणार आहेत.