साकोली मतदारसंघातून नाना पटोले विजयीFile Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:52 am
Updated on
:
23 Nov 2024, 11:52 am
पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्व राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची धावपळ सुरू झाली होती. साकोली मतदारसंघ काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्या नावाने ओळखला जातो. नाना पटोले हे या मतदार संघातील विद्यमान आमदार आहेत. काँग्रेसकडून नानाभाऊ पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात भाजपाकडून अविनाश ब्राह्मणकर रिंगणात उतरले आहे. नाना पटोले यांनी अविनाश ब्राह्मणकर यांचा सुमारे 560 मतांनी पराभव केला. यंदा साकोलीत कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. 2009 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी या जागेवर दमदार विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, पण ती गमावली. नंतर, एनडीए सरकारने शेतकरी विधेयकांच्या विरोधात आक्रोश केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना ऑल इंडिया शेतकरी मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले.