महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले, आज शनिवारी ( २३ नोव्हेंबर ) रोजी निकाल जाहीर होत आहेत. महायुतीने बहुमताची आकडा गाठल्यात जमा आहे. सर्व उमेदवारांचे मतदानाचे आकडे जाहीर होत असताना एका उमेदवाराला केवळ १४६ मते मिळालेली आहेत.
versova vidhansabha effect 2024
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांची मतमोजणी सुरु आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कायम ठेवण्यात यशस्वी झालेली आहे. मुंबई येथील वर्सोवा विधानसभा मतदार संघात बातमी लिहीपर्यंत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार हारुन खान ६१,९५८ मतांनी पुढे आहेत. तर भाजपाचे उमेदवार भारती लव्हेकर ५८,४७४ मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत. परंतू एका उमेदवाराची खूपच चर्चा सुरु आहे. या ठिकाणी बिग बॉसचे माजी कंटेस्टेंट अभिनेते आणि स्वत:ला मुंबईचा भाई म्हणाले एजाज खान निवडणूकीच्या मैदानात आहेत.
उत्तर प्रदेशातील नगीना येथील खासदार चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष आझाद समाज पार्टी ( कांशीराम) यांच्यातर्फे वर्सोवा मतदार संघातून निवडणूक लढविणारे एजाज खान यांना केवळ १४६ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे या एजाज खान यांचे इंस्टाग्रामवर ५.५ दशलक्षहून अधिक चाहते आहेत. तर फेसबुकवर त्यांना ४.१ दशलक्ष फॉलोअर आहेत. सोशल मिडीयावर इतके लोकप्रिय असलेल्या एजाज खान यांना १८ व्या फेरीनंतर केवळ १४६ मत मिळाले आहेत. हा आकडा नोटापेक्षा देखील कमी आहे. या मतदार संघात नोटाला आतापर्यंत १२१६ मते मिळाले आहेत. या मतदार संघात २० नोव्हेंबरवर ५१.२ टक्के मतदान झाले आहे.
हे सुद्धा वाचा
युट्युबर कॅरी मिनाटी याने मागितली होती माफी
एजाज खान हिंदी बिग बॉस सिझन – ७ मध्ये असताना त्यांची युट्युबर कॅरी मिनाटी यांनी खिल्ली उडविली होती. त्यानंतर काही काळांनी कॅरी मिनाटी याचा एजाज खान याच्याशी सामना झाला तेव्हा एजाज खान याने त्याच्याकडून या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करायला लावली होती. या व्हिडीओत युट्युबर कॅरी मिनाटी याने आपला चेहरा लपवलेला होता. त्याचा मास्क एजाज खान यांनी उतरवला आणि म्हणाला हा पाहा कॅरी याने माझी टींगल उडविली होती. आता कॅरी माझ्या फॅनीची माफी मागेल. त्यानंतर कॅरी म्हणाला,’सर प्लीज’! तेव्हा कॅरीला उद्देश्यून एजाज म्हणाला की प्रत्येक बिळात हात घालू नये. सर्वात उंदीर नसतात. काहीमध्ये साप देखील असतात ! तेव्हा कॅरी म्हणाला की ‘तुम्हाला वाईट वाटले असेल तर सॉरी’!