महाराष्ट्राच्या विधान सभेच्या निकालांचा सुरुवातीचा कल महायुतीच्या बाजूने आला आहे. महाराष्ट्रात महायुती स्पष्ट बहुमताकडे चालली आहे. या भाजपाला १२४ हून अधिक जागांवर आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात येणे हे जवळपास निश्चित झालेले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी प्रचंड पिछाडीवर आहे. महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या पेक्षाही महाविकास आघाडीला कमी जागा मिळत असल्याचे सुरुवातीच्या कलावरुन दिसत आहेत.त्यामुळे राज्यात शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी मात करुन ते महाराष्ट्रातील चाणक्य ठरले आहेत.
महायुती १२४ जागांवर पुढे
महायुतीला विधानसभेच्या विधानसभेच्या २८८ जागा पैकी भाजपाला तब्बल १२४ जागांवर पुढे आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५५ जागांवर पुढे आहे. तर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ३८ जागांवर पुढे आहे. तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे १९ जागी तर शिवसेना ठाकरे यांची १९ जागी तर शरद पवार यांची राष्ट्रवादी १३ जागांवर तर इतर २० जागांवर उमेदवार मतमोजणीत पुढे आहेत.
या निकालाची काय आहेत वैशिष्ट्ये पाहूयात.
१ – निकालामुळे भाजपात फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.
२ – निकालानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर येण्याची चिन्हं
३ – देवेंद्र फडणवीस यांची सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणक्यावर मात
४ – भाजपाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ८४ टक्के स्ट्राईक रेट
५ – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला सलग तिसऱ्यांदा बहुमत
६ – देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४,२०१९ आणि २०२४ ला भाजपाचा रेकॉर्डब्रेक जागा
७ – उद्धव ठाकरे सोबत नसताना दुसऱ्यांदा सरकार आणण्यात फडणवीस यांना यश
८ -भाजपा आणि दादांची राष्ट्रवादी मिळून देखील बहुमत गाठलं
९ – शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदानंतर देवेंद्र फडणवीस आता CM होण्याची चिन्हं
१० – मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा, महाराष्ट्रात भगवं वादळ