यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कुणाला पसंती दिली हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहेच, पण त्याआधी काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे.
आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. गेल्या पाच वर्षभरात राज्यातील राजकारणाची अक्षरशः खिचडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कुणाला पसंती दिली हे येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहेच, पण त्याआधी काही संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. या आकडेवारीतून कुणाची सत्ता राज्यात येऊ शकते किंवा कशी राजकीय परिस्थिती निर्माण येऊ शकते, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समोर आलेल्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाविकास आघाडीला सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यताही या एक्झिट पोलच्या अंदानुसार वर्तवण्यात येत आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुतीला 122 ते 186 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला फक्त 69 ते 121 जागांवर समाधान मानावं लागण्याचा अंदाज आहे. तर इतर अपक्षांना 12 ते 29 जागांवर यश मिळण्याची शक्यता पोल डायरीच्या अंदाजानुसार वर्तवण्यात येत आहे.
Published on: Nov 20, 2024 07:19 PM