देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे, अजित पवार.Pudhari Photo
Published on
:
23 Nov 2024, 7:23 am
Updated on
:
23 Nov 2024, 7:23 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महायुतीने २१७ जागांवर स्पष्ट बहुमताची आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. इतर २० जागांवर आघाडीवर आहे. 'हा दणदणीत विजय असून लाडक्या बहिणींचे अभिनंदन' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयानंतर दिली आहे. दरम्यान, महायुतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
दरम्यान, भाजपची विधीमंडळ पक्षाची बैठक २५ नोव्हेंबर रोजी आणि सरकारचा शपथविधी सोहळा २६ रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. तर महायुती आघाडीची बैठकही याच सुमारास होण्याची शक्यता आहे.