जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एका सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची तब्येत बिघडली. भाषण करत असतानाच खरगे चक्कर येऊन मंचावर कोसळले. कठुआ जिल्ह्यातील जसरोटा विधानसभा मतदारसंघातील बरनोटी येथे एका सभेला संबोधित करताना ही घटना घडली. यामुळे काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांचीही पळापळ सुरू झाली.
#WATCH | Jammu and Kashmi: Congress President Mallikarjun Kharge became unwell while addressing a public gathering in Kathua. pic.twitter.com/OXOPFmiyUB
— ANI (@ANI) September 29, 2024