Mharashtra PoliceFile Photo
Published on
:
29 Nov 2024, 9:10 am
Updated on
:
29 Nov 2024, 9:10 am
नेवाळी :
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कल्याण पूर्व येथील ग्रामीण भागात पोलिसांचा गावागावात बंदोबस्त तैनात झाला आहे. मात्र पोलिसांच्या ताफ्यात वाहन नादुरुस्त असल्याने वाहन सुरू करण्यासाठी पोलिसांना वाहनाला धक्का देण्याची वेळ आली आहे.
पोलिसांचा वाहनाला धक्का देतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कल्याण पूर्व येथील ग्रामीण भागात पोलिसांची गस्त वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत आहेत. मात्र हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी चौकात पोलिसांचे वाहन नादुरुस्त असल्याने ते सुरू करण्यासाठी पोलिसांवर वाहनाला धक्का देण्याची वेळ आली आहे. पोलीस वाहनाला धक्का देतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समाज माध्यमांवर राजकारण्यांवर नागरिकांनी टिककेची झोड घेतली आहे.
पोलीसांच्या हातात नादुसरुस्त वाहन असल्यास पोलीस गुन्हेगारीला कशी आवर घालणार असा प्रश्न यावरून उपस्थित झाला आहे. एकीकडे पोलिसांच्या ताफ्यात नवीन वाहन दाखल होत आहेत.
मात्र दुसरीकडे जुनी वाहन सध्या पोलिसांना पेट्रोलिंगसाठी त्रास देत असल्याने पोलीस देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची वाहन तरी सुव्यवस्थित कधी होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.