Minor girl suicide: अल्पवयीन मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

2 hours ago 1

रिसोड (Minor miss suicide) : तालुक्यातील गोहगाव हाडे येथे अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 27 सप्टेंबर 2024 ला सकाळी 10 वाजता घडली. मुली सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील गोहगाव हाडे येथील स्वाती सुभाष गायकवाड व 17 वर्ष या अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरी 27 सप्टेंबर 2024 ला सकाळी 10 वाजता आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन (Minor miss suicide) आत्महत्या केली.

स्वाती गायकवाड ही आपल्या आजीसह एकटीच घरी राहत असून ती वाकद येथील श्री शिवाजी महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. घटनेची माहिती कळताच रिसोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गीते आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. (Minor miss suicide) आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गीते, एएसआय वसंत तहकीक, गणेश हाके व रिसोड पोलीस करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article