प्रेत फेकले सूर नदीपात्रात
मोहाडी (Mohadi Murder Case) : भंडारा जवळील वरठी पोलिस स्टेशन अंतर्गत दाभा (जमनी) गावाजवळील सूर नदीपात्रात दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी पाण्यावर प्रेत तरंगताना दिसून आले. माहिती होताच घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. प्रेत पाण्याबाहेर काढले असता धक्कादायक माहिती उघडकीस आली. मृतकाची गळा चिरून हत्या केल्याचे दिसून येताच पोलिस प्रशासनात मोठी खडबड उडाली. वरठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या (Mohadi Murder Case) घटनेतील चार हत्यारांना काही तासातच ताब्यात घेतले. विचारपूस केली असता बायकोच्या अपमानामुळे मालकाचा राग अनावर होऊन आपल्या साथीदाराच्या मदतीने हॉटेलमध्येच काम करणार्या नोकराचा गळा चिरून प्रेत सूर नदीत फेकल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. शिवगोपाल शालिकराम बावनकर (४२) रा. अर्जुनी ता. तिरोडा असे मृतकाचे नाव आहे.
चार हत्यारे पोलिसांच्या ताब्यात
आरोपींमध्ये राजेंद्र ऊर्फ शेखर पडोळे (४५) रा. केसलवाडा, चेतन सा’वणे (३१), आशिष वाघमारे (३०) दोन्ही रा. शिरसी व मयूर ऊर्फ शुभम खोब्रागडे (२९) रा. गांधी वार्ड वर’ी अशी आरोपींची नावे आहेत. मृतक हा राजेंद्र पडोळे याच्या मालकीच्या वरठी येथील हॉटेलमध्ये नोकर म्हणून कामाला होता. दि.२१ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता दरम्यान मृतक याने मद्य प्राशन करून हॉटेल मालक राजेंद्र पडोळे याचेशी भांडण केले. भांडण विकोपाला पोहोचला.
बायकोच्या अपमानामुळे मालकाचा राग अनावर
मृतक याने मालकाच्या बायकोला अपमानास्पद बोलून शिवीगाळ केली. तसेच मृतक हा मालकावर मारण्यास चवताळून धावला. (Mohadi Murder Case) बायकोचा अपमान हॉटेल मालकाला अनावर झाल्याने त्याने इतर आपल्या आरोपी साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी त्या ‘िकाणी पोहोचून शिवगोपाल बावनकर याची पिटाई केली. त्याला चारचाकी वाहनात कोंबून शिरसी गावाकडे आणले. रस्त्यात त्याचा गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत दाभा गावाजवळील कोथुर्णा रस्त्यावरील सूर नदी पात्रात फेकले. दि.२२ नोव्हेंबर रोजी सकाळी घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. वरठीचे ठाणेदार अभिजित पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळ गा’ून प्रेत पाण्याबाहेर काढून पाहिले असता मृतकाच्या गळ्यावर चिरल्याची जखम दिसून आली.
यावरून मृतकाची हत्या करून प्रेत नदीपात्रात फेकण्यात आल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मृतकाची ओळख पटविली. ओळख पटताच हॉटेल मालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली. या (Mohadi Murder Case) घटनेत सहभागी असलेल्या अन्य तिघा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवित शिवगोपाल बावनकर याच्या चार हत्यार्यांना काही तासातच अटक करण्यात आली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक इश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचुळकर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गा’ून पाहणी केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनात वरठीचे ठाणेदार अभिजीत पाटील व सहकारी करीत आहेत.