Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट; मुंबई पोलिसांना आला फोन

2 hours ago 2

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट; मुंबई पोलिसांना आला फोन file photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

28 Nov 2024, 6:36 am

Updated on

28 Nov 2024, 6:36 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत राज्यातील नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता असतानाच त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा फोन मुंबई पोलिसांना आला आहे. धमकीचा फोन येताच खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे.

बुधवारी रात्री ९ च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकी देणारा फोन आला होता. पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट सुरू असून तयारी झाल्याचे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मुंबईच्या आंबोली पोलिसांनी कॉल करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी महिलेची चौकशी करून तिची पार्श्वभूमी देखील तपासली. परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. कौटुंबिक समस्यांमुळे पीडित महिलेने असा फोन केला होता. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article