Published on
:
20 Nov 2024, 4:26 am
Updated on
:
20 Nov 2024, 4:26 am
नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क - राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. जिल्ह्यातही सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत. राज्यात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पारड्यात आज कौल टाकतात याकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
भाजपचे उमेदवार ॲड राहुल ढिकले
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड राहुल ढिकले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क
अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क
येवला : नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवला येथील जनता विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. शेफाली भुजबळ यांनी देखील त्यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.
नाशिक मध्य मतदारसंघाच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावमध्ये बजावला मतदानाचा हक्क
पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी सपत्नी वनारे येथे केले मतदान
महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी सपत्नी वनारे येथे मतदानाचा हक्क बजावला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता ताई चारोस्कर यांनी पाडे येथे मतदान केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनिता चारोस्कर यांनी पाडे येथे मतदान केले.
देवळा : सुभाष नगर ता. देवळा येथे मतदानाचा हक्क बजावताना अपक्ष उमेदवार केदा आहेर समवेत पत्नी धनश्री आहेर (छाया ; सोमनाथ जगताप)
देवळा : चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरवात झाली . देवळा तालुक्यात सकाळी 7 पासूनच सर्वच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. मतदार संघातील अपक्ष उमेदवार केदा आहेर यांनी सपत्नीक तालुक्यातील सुभाष नगर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान उमेदवार केदा आहेर यांनी तालुक्यातील खर्डे परिसरातील मतदान केंद्रावर भेटी दिल्या .
मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नटावद येथे बजावला मतदानाचा हक्क(छाया :योगेंद्र जोशी)
मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नटावद येथे बजावला मतदानाचा हक्क
नंदुरबार :- महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील नटावद येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाला जाण्यापूर्वी आदिवासींचे आराध्य दैवत याहा मोगी माता आणि श्रीगणेशाचे त्यांनी दर्शन घेऊन पूजन केले. जनकल्याणाच्या योजना राबवणाऱ्या महायुती सरकारने सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आणि त्यामुळेच मतदान केंद्रांवर आज महायुतीला विजयी करण्यासाठी मतदारांची रीघ लागलेली दिसली;, अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी माध्यमांसमोर बोलताना दिली.
जैन समूहाचे उद्योजक अशोक जैन यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला(छाया : नरेंद्र पाटील)
जैन समूहाचे उद्योजक अशोक जैन यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावला
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क(छाया : नरेंद्र पाटील)
मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
जळगाव : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या गावी पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत त्यांनी मतदारांना लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.