पिंपळगाव बसवंत : येथील एका शाळेत मतदानासाठी तरुण आणि महिलांची झालेली गर्दी.(छाया : सुरेश पगारे)
Published on
:
21 Nov 2024, 9:50 am
Updated on
:
21 Nov 2024, 9:50 am
पिंपळगाव बसवंत: निफाड मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि२०) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत किरकोळ कुरबुरी वगळता शांततेत टक्के मतदान पार पडले. निफाड तालुक्यातील २७८ मतदान केंद्रावर प्रशासनाकडून मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
पिंपळगाव बसवंत : येथील एका शाळेत मतदानासाठी झालेली गर्दी.(छाया : सुरेश पगारे)
निफाड तालुक्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रकिया संपन्न झाली. प्रशासनाकडून तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी स्वच्छता आदी सुविधेसह सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तालुक्यातील पिंपळगाव हायस्कुल येथे मतदारांना आकर्षण ठरणारे आदर्श मतदान केंद्र लक्षवेधी ठरले. विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यातील तब्बल २७८ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत ३१.८०टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६३.२५ मतदान पार पडले. तर अखेरच्या टप्प्यात एकूण टक्के मतदान झाले. अंतिम चित्र (दि.२३) रोजी होणाऱ्या मतमोजणीतुन स्पष्ट होणार असल्याने निकालाकडे लक्ष लागून आहे.
निफाडच्या राजकारणात बनकर आणि कदम यांच्यात जोरदार चुरस असली तरी यंदा तीन-तीन पक्षांच्या दोन आघाड्यांमुळे निवडणुकीच्या निकालांबाबत कमालीची उत्सुकता निमाण झालेली आहे. दर पंचवार्षिकला वेगला कौल देणारा निफाड यंदाच्या फाटाफुटीच्या राजकारणात कोणाला कौल देणार, याकडे नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. पिंपळगाव बसवंत शहरातही जोरदार मतदान झाले. सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.
दरम्यान बुधवार (दि.20) सायंकाळी सहानंतर कसबे सुकेणे येथे मतदान केंद्रावर काही यंत्र बंद पडल्यामुळे नागरिकांना काही काळ मतदान करण्यास उशीर झाला.