Nashik Combat Army : अत्याधुनिक हेलिकॉप्टरमुळे सैन्य दलाची शक्ती वाढेल

1 hour ago 1

नाशिक : येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये दीक्षांत समारंभात युद्धाची चित्तथरारक प्रात्यिक्षिके सादर करताना प्रशिक्षण पूर्ण केलेले हवाई दलाचे अधिकारी. (छाया : हेमंत घोरपडे)

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Nov 2024, 4:40 am

Updated on

30 Nov 2024, 4:40 am

नाशिक : भारतीय सैन्य दलाची शाखा असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये भविष्याचा वेध घेऊन विविध बदल घडविण्यात येत आहेत. या माध्यमातून भारतीय सैन्य दल आत्मनिर्भर होण्यासह आगामी काळात एएच -64, अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरच्या समावेशाने देशाची लष्करी ताकद वाढणार आहे, असा विश्वास आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोदकुमार नांबियार यांनी व्यक्त केला.

नाशिक रोडस्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल येथे कॉम्बॅट एव्हिटर्स कोर्स ४२, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स ४१ आणि बेसिक रिमोटली पायलोटेड एअरक्राफ्ट सिस्टिम इंटर्नल पायलट कोर्स ४ चा दीक्षांत समारंभ सोहळा शुक्रवारी (दि. २९) झाला. याप्रसंगी स्कूलचे ऑफिशिएट कमांडंट ब्रिगेडिअर सत्यवीर शौकीन, महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणच्या आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते.

नांबियार म्हणाले की, तांत्रिक पातळीवरही आपल्या वैमानिकांनी जागतिक पातळीवरील उच्चतमता राखली आहे. येत्या काळात लढाऊ हेलिकॉप्टरशिवाय प्रिडेटरही समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे लढाऊ क्षमता अधिक वृद्धिंगत होणार आहे. आधुनिकीकरणासह पायाभूत सुविधांना बळकटी देण्याचे धोरण असून, देशातील सर्व तळांसोबतच सीमेवरील तळांवरही पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.

तरुण वैमानिक देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे उड्डाण मोहिमा सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कराव्यात. लवकरच फ्लाइंग सिम्युलेटर विकसित करण्यावर आणि 'आत्मनिर्भर - भारत' उपक्रमावरही लक्ष केंद्रित करणार आहोत. ॲडव्हान्स कॉम्बॅट ट्रेनिंग कोर्समध्ये मानवरहित संघ प्रशिक्षणाचा यशस्वी परिचय हे असेच उदाहरण आहे. सध्या भारतीय सैन्यात प्रगतिपथावर असलेल्या एकूण प्रशिक्षण परिवर्तन आणि 'ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन' प्रक्रियेत कॅट्स प्रभावी योगदान देत असल्याबद्दल त्यांनी उदगार काढले.

यावेळी नांबियार यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. ॲडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर ध्रुव, रुद्र यांच्या विविध थरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. डोग्रा, कॅप्टन अमित रघुवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा गौरव

समारंभात नेपाळसह नायजेरिया आणि भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून पदवी प्राप्त केली. कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी कॅप्टन सक्षम गोस्वामी यांना प्रदान करण्यात आली. एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी कॅप्टन हेन्री रजनी यांना प्रदान करण्यात आली. आरपीएएस अंतर्गत पायलट कोर्समधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याची ट्रॉफी मेजर अरविंदर पुरी यांना आणि ऑब्झर्व्हर स्ट्रीममधील ट्रॉफी मेजर तुफैल अहमद यांना देण्यात आली.

प्रशिक्षण क्षमतेचा विस्तार

लेफ्टनंट जनरल विनोदकुमार नांबियार म्हणाले की, कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा कायापालट ही आनंददायी बाब आहे. आज कॅट्स एका प्रशिक्षण वर्षात 17 अभ्यासक्रम चालवते. गेल्या दशकभरात, कॅट्स भारतीय सैन्याच्या 'प्रीमियर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'मध्ये बदलले आहे. नजीकच्या काळात प्रशिक्षण क्षमतेचा अधिक विस्तार केला जाणार आहे, असे सांगताना नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार वैमानिकांनी करावा, असेही आवाहन त्यांनी केले.

कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये दीक्षांत समारंभात युद्धाची चित्तथरारक प्रात्यिक्षिके पहा फोटो

Nashik Combat Army

नाशिक रोडस्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल(छाया : हेमंत घोरपडे)

Nashik Combat Army

नाशिक रोडस्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल(छाया : हेमंत घोरपडे)

Nashik Combat Army

नाशिक रोडस्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल(छाया : हेमंत घोरपडे)

Nashik Combat Army

नाशिक रोडस्थित कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल(छाया : हेमंत घोरपडे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article