Nashik Crime | डॉक्टरचे वाहन अडवून साडेतीन लाख लुटले

3 hours ago 1

घोटी | अज्ञात लुटारुंनी याच कारमधून लूट केली. Pudhari

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Nov 2024, 7:02 am

Updated on

30 Nov 2024, 7:02 am

घोटी : मुंबई आग्रा महामार्गावर मुढेगाव शिवारात बुधवारी (दि.२७) रात्री १० च्या सुमारास चार ते पाच जणांनी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे वाहन अडवून मारहाण केली तसेच दम दाटी करून कारच्या सीटखाली असलेले जवळपास साडेतीन लाख रुपये लुटले. चेकबुक तसेच न्यायालयीन कागदपत्रे असलेली पिशवी ही घेऊन लुटारूंनी पोबारा केला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबई येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रमेश उद्धव कुलकर्णी (७५, रा. आडगाव, नाशिक) हे बेलोरो कारने (क्र. एमएच १५, जेएक्स १६२४) नाशिकला जात असताना मुढेगाव शिवारात ३० ते ४० वयोगटातील जवळपास चार अज्ञात व्यक्तींनी पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी रस्त्यात आडवी थांबवून चालकास शिवीगाळ करून मारहाण केली.

डॉक्टरांच्या कारमधील जवळपास साडेतीन लाख रुपये तसेच कल्याण जनता बैंक, विश्वास को-ऑप. बँक तसेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांचे तीन चेकबुक आदी मुद्देमाल चोरून नेला. डॉ. रमेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून घोटी पोलिसांनी ३० ते ४० वयोगटातील अज्ञात लुटारूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच तपासकामी उपयुक्त सूचना केल्या. पोलिस उपनिरीक्षक अजय कौटे यांच्यासह पथक घटनेचा पुढील तपास करीत आहे.

वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेने महामार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास लुटारूंनी चारचाकी वाहनाचा वापर करून लुटले. त्यामुळे या घटनेबाबत पोलिस यंत्रणेने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article