नाशिक : मविप्र मॅरेथॉनसाठी धावण मार्गाचे मोजमाप व पूजन करताना ॲड. नितीन ठाकरे. समवेत हेमंत पांडे, विश्वास मोरे, ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे आदी.(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
:
30 Nov 2024, 4:14 am
Updated on
:
30 Nov 2024, 4:14 am
नाशिक : विद्या प्रसारक समाज संस्था आयोजित ९ वी राष्ट्रीय आणि १४ वी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा बिगुल वाजला असून, यंदा १२ जानेवारी २०२५ रोजी नाशिकमध्ये थरार रंगणार आहे. शुक्रवारी (दि.२९) सकाळी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते धावण मार्ग मोजमाप व विधिवत पूजनाने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, डॉ. सयाजीराव गायकवाड, ॲड. संदीप गुळवे, डॉ. भास्कर ढोके आदी उपिस्थत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते बायसिकल व्हिलचे पूजन करण्यात आले. अशोक काळे, सुहास खर्डे, राजाराम पोटे, जगदीश डिंगे, केशव खताळे व समितीने पुढील धावण मार्ग मोजमाप प्रक्रिया पार पडली. डॉ. मीनाक्षी गवळी आणि अनिल उगले यांनी सूत्रसंचालन केले. मंगला शिंदे यांनी आभार मानले.
आजवर या नामवंत खेळाडूंची उपस्थिती
आतापर्यंत धनराज पिल्ले, काका पवार, लालचंद राजपूत, कविता राऊत, पी. टी. उषा, सुशील कुमार, व्हीव्हीएस लक्ष्मण, गगन नारंग, नरसिंग यादव, अंजू बॉबी जॉर्ज, दत्तू भोकनळ, ललिता बाबर, अजित लाकरा यांनी उपस्थिती लावली आहे.
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते धावण मार्ग मोजमाप व विधिवत पूजनाने राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ झाला.(छाया : हेमंत घोरपडे)
कोरोना अपवाद वगळता ३० वर्षांपासून संस्थेतर्फे या स्पर्धांचे आयोजन केले जाते. रूट मेजरमेंट हा या स्पर्धेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्पर्धेसाठी देश-विदेशातून खेळाडू सहभागी होतात. स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी-कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक