जिल्हा परिषदेत लाच घेणारे दोघे जाळ्यातFile Photo
Published on
:
18 Oct 2024, 3:17 am
Updated on
:
18 Oct 2024, 3:17 am
नाशिक : जिल्हा परिषदेत लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना पकडले. गुरुवारी (दि. १७) सायंकाळी ही कारवाई झाली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. आचारसंहिता लागू झाल्यापासून शासकीय कार्यालयांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या रोडावलेली असताना ही कारवाई झाली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.