NCP Ajit Pawar Winner List : अजित पवार गटाच्या सर्व विजयी उमेदवारांची A टू Z यादी, तुमच्या आमदाराचा क्रमांक कितवा?

3 hours ago 1

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील या निवडणुकीत घवघवीत यश मिळताना दिसत आहे. अजित पवार गटाने केवळ 53 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी तब्बल 41 उमेदवारांचा विजय झाला आहे. या सर्व विजयी उमेदवारांची यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 अजित पवार गटाच्या सर्व विजयी उमेदवारांची A टू Z यादी, तुमच्या आमदाराचा क्रमांक कितवा?

अजित पवार, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook

| Updated on: Nov 23, 2024 | 7:28 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा भरघोस मतांनी विजय मिळालेला बघायला मिळत आहे. भाजपने तर सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. भाजपला तब्बल 130 पेक्षा जास्त जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर शिंदे गटाला 55 पेक्षा जास्त जागांवर यश मिळताना दिसत आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील या निवडणुकीत घवघवीत यश मिळताना दिसत आहे. अजित पवार गटाने केवळ 53 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी तब्बल 41 उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये त्यांच्या लाडक्या बहिणींचादेखील समावेश आहे. जनतेने अजित पवारांच्या लाडक्या बहिणींना अफाट मतांनी विजयी केलं आहे.

अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी लाडक्या बहीण योजनेचा प्रचारात अनेकदा उल्लेख केला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री असताना राज्यभरात दौरा केला तेव्हा ठिकठिकाणी महिलांच्या भेटीगाठी घेत लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज भरला का, योजनेचे पैसे बँक खात्यात आले का? अशी विचारपूस देखील केली. अजित पवार यांच्या या विचारपूसचा त्यांना फायदा झालेला बघायला मिळतोय. विशेष म्हणजे पक्षातीलही त्यांच्या लाडक्या बहिणींना जनेतेने भरघोस मतांनी विजयी केली आहे. अजित पवार गटातील 4 महिला उमेदवारांचा विजय झाला आहे. याचाच अर्थ अजित पवार गटाच्या 4 लाडक्या बहिणींना जनतेचा आशीर्वाद मिळालेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस विजयी उमेदवारांची A टू Z यादी

  • १) अमळनेर – अनिल पाटील – विजयी
  • २)अमरावती शहर – सुलभा खोडके – विजयी
  • ३) अर्जुनी – मोरगाव – राजकुमार बडोले – विजयी
  • ४) अहेरी – धर्मरावबाबा आत्राम – विजयी
  • ५) पुसद – इंद्रनील नाईक – विजयी
  • ६) लोहा – प्रतापराव पाटील – चिखलीकर – विजयी
  • ७) वसमत – राजू नवघरे – विजयी
  • ८) पाथरी – राजेश विटेकर – विजयी
  • ९) कळवण – नितीन पवार – विजयी
  • १०) शिरूर – ज्ञानेश्वर कटके – विजयी
  • ११) इंदापूर – दत्तामामा भरणे – विजयी
  • १२) बारामती – अजित पवार – विजयी
  • १३) येवला – छगन भुजबळ – विजयी
  • १४) सिन्नर – माणिकराव कोकाटे – विजयी
  • १५) निफाड – दिलीपकाका बनकर – विजयी
  • १६) दिंडोरी – नरहरी झिरवाळ – विजयी
  • १७) देवळाली – सरोज अहिरे – विजयी
  • १८) इगतपुरी – हिरामण खोसकर – विजयी
  • १९) शहापूर – दौलत दरोडा – विजयी
  • २०) अणुशक्तीनगर – सना मलिक – शेख – विजयी
  • २१) श्रीवर्धन – अदितीताई तटकरे – विजयी
  • २२) आंबेगाव – दिलीप वळसे पाटील – विजयी
  • २३) भोर – शंकर मांडेकर – विजयी
  • २४) मावळ – सुनिल शेळके – विजयी
  • २५) पिंपरी – अण्णा बनसोडे – विजयी
  • २६) हडपसर – चेतन तुपे – विजयी
  • २७ ) अकोले – डॉ. किरण लहामटे – विजयी
  • २८) कोपरगाव – आशुतोष काळे – विजयी
  • २९) पारनेर – काशिनाथ दाते – विजयी
  • ३०) अहमदनगर शहर – संग्राम जगताप – विजयी
  • ३१) गेवराई – विजयसिंह पंडित – विजयी
  • ३२) माजलगाव – प्रकाश सोळंके – विजयी
  • ३३) परळी -धनंजय मुंडे – विजयी
  • ३४) अहमदपूर – बाबासाहेब पाटील – विजयी
  • ३५) उदगीर – संजय बनसोडे – विजयी
  • ३६) फलटण – सचिन पाटील – विजयी
  • ३७) वाई – मकरंद पाटील – विजयी
  • ३८) चिपळूण – शेखर निकम – विजयी
  • ३९) कागल – हसन मुश्रीफ – विजयी
  • ४०) तुमसर – राजू कारेमोरे – विजयी
  • ४१)सिंदखेडराजा – मनोज कायंदे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article