मतदारानाचा हक्क बजावून आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकतांना दिसत आहे.Pudhari News network
Published on
:
20 Nov 2024, 6:25 am
Updated on
:
20 Nov 2024, 6:25 am
पालघर : पुढारी ऑनलाइन डेस्क - पालघर हा मतदारसंघ मागच्या दहा वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. 2019 मध्ये श्रीनिवास चिंतामण वनगा हे शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. तर 2014 या निवडणुकीत कृष्णा अर्जुन घोडा हे आमदार होते. त्याआधीच्या निवडणुकीत म्हणजेच 2009 मध्ये काँग्रेसचे राजेंद्र धेड्या गावित निवडून आले होते. यंदा शिवसेना पक्ष फुटीनंतर कोणाचे पारड्यात मतैधिक्य जाणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
बोईसर विधानसभा वसई क्षेत्रात सकाळपासून मतदानाला सुरवात झाली असून भाताणे मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. Pudhari News network
भाताने येथील मतदान केंद्रात आमदार राजेश पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. Pudhari News network
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मिळेल त्या वाहनाने प्रवास करुन हजेरी लावत आहेत.Pudhari News network
वसई पूर्व विभागात आतापर्यंत शांततेत व कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रीया पार पडत आहे. मतदारांनी सकाळपासून मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. सकाळी साडे दहा पर्यंत अनेक ठिकाणी 20 टक्केच्या आसपास मतदान झाले आहे.
खानिवडे येथे सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. Pudhari News network
खानिवडे येथे सकाळ 7 वाजेपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या असून सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत जवळपास 40 टक्के मतदान झाले आहे.
वसई मतदारसंघातील माणिकपूर केंद्रामध्ये शेठ विद्यामंदिर इंग्लिश स्कूल हायस्कूल वसंत नगरी सेक्टर ४ येथे सकाळपासून मतदारांनी केलेली गर्दीPudhari News network
बोईसर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास तरे यांनी गांजे या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.Pudhari News network