परभणी (Parbhani):- हिवाळा हा ऋतु आरोग्य वर्धक मानला जातो. या काळात शारिरीक कवायत(Physical exercise), व्यायामाबरोबरच पौष्टिक आहारावर देखील भर दिला जातो. आरोग्य निरोगी व सुदृढ असावे म्हणून सुकामेव्यापासून (dry fruits) बनवलेले लाडू उपयुक्त असल्याने सध्या बाजारपेठेत सुकामेव्याला मागणी वाढली आहे.
हिवाळा हा जसा आरोग्यवर्धक ऋतु मानला जातो
हिवाळा हा जसा आरोग्यवर्धक ऋतु मानला जातो, तसाच या काळात थंडीमुळे ताप, सर्दी, खोकला आदी संसर्गजन्य आजाराच्या तक्रारी देखील वाढत असतात. हिवाळ्यात शरिर तंदुरुस्त राहण्यासाठी पौष्टीक खुराक आणि व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर्स मंडळी देत असतात. त्यामुळे या काळात अनेक जण जीम, फिटनेस क्लबची वाट धरतात. सध्या शहरातील बहूतांश व्यायामशाळेत युवावर्गाची संख्या वाढली आहे. त्याच बरोबर हायटेक जीममध्ये (Hi-tech gym) देखील बर्यापैकी संख्या आहे. पहाटे कृषी विद्यापीठ परिसर, वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोडवर मॉर्निंग वॉकसाठी जेष्ठ नागरीक, महिलावर्ग मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. शिवाय राजगोपालचारी उद्यानातही ओपन जीमचा अनेक जण उपयोग करताना दिसून येतात. शिवाय पौष्टीक सुकामेव्याला मागणी वाढली आहे. शहरातील अपना कॉर्नर, जनता बाजार, गांधी पार्क, गुजरी बाजार, जूना मोंढा या भागात मोठ्या प्रमाणात सुकामेवा विक्रीसाठी उपलब्ध आहे.