परभणी/चारठाणा (Parbhani):- पैसे काढण्यासाठी एटीएमवर गेलेल्या एकाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करत एटीएम मधून २५ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक करण्यात आली. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास देवगाव फाटा येथील एटीएमवर घडली.या प्रकरणी अनोळखी इसमावर चारठाणा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक केल्या प्रकरणी अनोळखी इसमावर परभणीतील चारठाणा पोलिसात गुन्हा दाखल
विठ्ठल सुभाषराव घुगे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेले एटीएम कार्ड घेऊन पैसे काढण्यासाठी देवगाव फाटा येथील एटीएमवर गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन एटीएम कार्डची (ATM Card)अदलाबदल केली. त्यानंतर फिर्यादीच्या कार्डचा वापर करत २५ हजार रुपये काढून घेतले. फसवणूक(Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर विठ्ठल घुगे यांनी चारठाणा पोलीस ठाणे गाठत तक्रार(complaint) दाखल केली. तपास पोउपनि. थोरवे करत आहेत.