परभणी(Parbhani) :- शहर महापालिकेच्या वतीने दिनदयाल उपाध्याय नागरी उप जिवीका अभियान अंतर्गत साखला प्लॉट येथे बेघर व्यक्तींसाठी सावली नावाचे बेघर निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी ३० बेघर व्यक्तींना आसरा मिळाला आहे. यामध्ये दहा महिला व वीस पुरुष आहेत.
बेघरांना त्यांचा हक्काचा निवारा मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीने सुविधा करण्यात आली
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. बेघरांना त्यांचा हक्काचा निवारा मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीने सुविधा करण्यात आली आहे. एकही व्यक्ती निवार्या विना राहू नये, हा या मागचा उद्देश आहे. रेल्वे स्टेशन(Railway Station), बसस्टॅण्ड (bus Stand) व इतर ठिकाणी बेघर व्यक्ती आढळून आल्यास त्यांना बेघर निवार्यात आणावे. यासाठी व्यवस्थापक इख्तीयार पठाण यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव, अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे. परभणी शहरातील उड्डाणपुलाखाली, रेल्वे स्टेशन, बसस्थानक व इतर शासकीय कार्यालयांच्या मोकळ्या ठिकाणी बेघर राहतात. त्यांच्यासाठी हक्काचा निवारा मिळावा या करीता महापालिकेच्या वतीने बेघर निवार्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.