परभणी (Parbhani):- लग्न होत नाही म्हणून नैराश्यात आलेल्या एकाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केली. ही घटना २७ नोव्हेंबर रोजी सकाळी नानलपेठ भागात उघडकीस आली.
लग्न होत नसल्याने ते नैराश्यामध्ये होते
या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. गोविंद तापडिया यांनी खबर दिली आहे. चंदन तापडिया असे आत्महत्या करणार्याचे नाव आहे. चंदन तापडिया यांचे लग्न होत नसल्याने ते नैराश्यामध्ये होते. यातच त्यांनी घरातील खिडकीला सोडलेल्या लोखंडी जाळीला बेडशीटच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २७ नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आली. नानलपेठ पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोह. मुरकुटे करत आहेत.