Parbhani:- परभणी वन विभागातील (Forest section )वन विभागाच्या प्राण्यांच्या हल्ल्यात जिवित हानी व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींसह त्यांच्या कुटूंबियांना शासनाकडून मदतीचा हात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी येथील मोतीराम रंगनाथ गिराम हे गृहस्थ रान डुकराच्या हल्ल्यात मृत्यू पावले होते. त्यांचे वारस रामप्रसाद मोतीराम गिराम यांना वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाद्वारे 25 लाख रुपयांचे अर्थसहाय्याचा धनादेश प्रदान करण्यात आला. तर रानडुकाराच्या हल्ल्यातच गंभीर जखमी झालेल्या कात्नेश्वर येथील दिगंबर मारोती हेंडगे यांना 5 लाख रुपयांचा तसेच परभणी तालुक्यातील पोरवड येथील श्रीमती द्वारकाबाई दिगंबर तिडके यांना रानडुकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याबद्दल 5 लाख रुपयांचा धनादेश जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याहस्ते परभणी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत शुक्रवार 31 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदान करण्यात आला.
वनविभागाच्या पाठपुराव्याने शासनाने घेतली दखल….!
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक गंगाधर ढगे, वन परिक्षेत्र अधिकारी आर.आर. चव्हाण, वनपाल ए.आर. आयनिळे, वनपाल के.एम. थोरे, वनरक्षक श्रीमती शेख निलोफर शेख सत्तार हे उपस्थित होते.