परभणी/जिंतूर(Parbhani):- विटा भरलेल्या भरधाव ट्रकने उभ्या असलेल्या दुचाकीस्वारास चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू (Death)झाल्याची घटना दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता जिंतूर वरुड रस्त्यावर घडली आहे.
परभणीतील जिंतूर-वरुड रस्त्यावरील घटना
याबाबत अधिक माहिती अशी जिंतूर तालुक्यातील वरुड येथील वैभव ताठे व लखन ताठे दोघे चुलत भाऊ दूध घेऊन येत होते. दरम्यान वैभव ताठे यास सौच्यास जायचे असल्यामुळे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून सौच्यास गेला यावेळी लखन ताठे हा गाडीवर बसला असताना समोरून येणाऱ्या विटाने भरलेल्या ट्रक क्र MH 12 DT 2267 ने भरधाव गाडीवर बसलेल्या लखन ताठे यास समोरून धडक दिली. या धडकेत लखन याच्या डोक्याला जोराचा मार लागून मेंदू बाहेर पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला होता.
एका होतकरू तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ
दरम्यान घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात यांनी रुग्णवाहिका (Ambulance)चालक विजय राठोड यांना सोबत घेऊन घटनास्थळारून मृतदेह (Dead-body)ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. यावेळी शवविच्छेदन (Autopsy) करून प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतक लखन ताठे याच्यावर त्याच्या वरुड गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकाच्या पश्चात आई वडील व भाऊ असा परिवार आहे. एका होतकरू तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.