उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं. पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले. 40 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली. हीच गोष्ट शरद पवारांसह त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे या लढाईत अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना धूळ चारण्यासाठी शरद पवारांनी प्रचारातून जंगजंग पछाडलं.
शरद पवार, अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत एकूण 86 उमेदवारांची फौज मैदानात उतरवली आहे. या निवडणुकीत शरद पवार चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे भाजपमधून समरजित घाटगे, हर्षवर्धन पाटील सारख्या मातब्बर नेत्यांनी शरद पवारांटच्या पक्षात प्रवेश केला. शरद पवारांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमध्ये शरद पवार अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसले. शरद पवार सध्या 84 वर्षांचे आहेत. या वयात त्यांनी ज्या झुंजारपणे सभा घेतल्या ते अनेकांना भावलं आहे. त्यामुळे निवडणुकीत शरद पवार यांच्याबाजून पोषक वातावरण असल्याचं चित्र बघायला मिळालं. पण तरीदेखील मतदान अजून बाकी आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं. पक्षाचे दिग्गज नेते अजित पवारांसोबत गेले. 40 आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली. हीच गोष्ट शरद पवारांसह त्यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे या लढाईत अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्र्यांना धूळ चारण्यासाठी शरद पवारांनी प्रचारातून जंगजंग पछाडलं. यानंतर आता उद्या मतदान होणार आहे. जवळपास 37 जागांवर शरद पवार आणि अजित पवार यांचे उमेदवार समोरासमोर उभे आहेत. या ठिकाणी विजयाचा गुलाल कोण उधळतं? याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला या 37 मतदारसंघांमधील दोन्ही गटाच्या उमेदवारांची यादी सांगणार आहोत.
पवार विरुद्ध पवार, 37 जागांवर उमेदवार समोरासमोर
- तुमसर – चरण वाघमारे (शरद पवार गट) विरुद्ध राजू कारेमोरे (अजितद पवार गट)
- अहेरी – भाग्यश्री आत्राम (शरद पवार गट) विरुद्ध धर्मराव बाबा आत्राम (अजित पवार गट)
- पुसद – शरद मैंद (शरद पवार गट) विरुद्ध इंद्रनील नाईक (अजित पवार गट
- वसमत – जयप्रकाश दांडेगावकर (शरद पवार गट) विरुद्ध चंद्रकांत (राजू) नवघरे (अजित पवार गट)
- येवला – माणिकराव शिंदे (शरद पवार गट) विरुद्ध छगन भुजबळ (अजित पवार गट)
- सिन्नर – उदय सांगले (शरद पवार गट) विरुद्ध माणिकराव कोकाटे (अजित पवार गट)
- दिंडोरी – सुनीता चारोसकर (शरद पवार गट) विरुद्ध नरहरी झिरवळ (अजित पवार गट)
- शहापूर – पांडुरंग बरोरा (शरद पवार गट) दौलत दरोडा (अजित पवार गट)
- मुंब्रा कळवा – जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट) विरुद्ध नजीब मुल्ला (अजित पवार गट)
- अणुशक्तीनगर – फहाद अहमद (शरद पवार गट) विरुद्ध सना मलिक (अजित पवार गट)
- श्रीवर्धन – अनिल नवगणे (शरद पवार गट) विरुद्ध अदिती तटकरे (अजित पवार गट)
- जुन्नर – सत्यशील शेरकर (शरद पवार गट) विरुद्ध अतुल बेनके (अजित पवार गट)
- आंबेगाव – देवदत्त निकम (शरद पवार गट) विरुद्ध दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट)
- शिरुर – अशोक पवार (शरद पवार गट) विरुद्ध ज्ञानेश्वर कटके (अजित पवार गट)
- इंदापूर – हर्षवर्धन पाटील (शरद पवार गट) दत्तात्रय भरणे (अजित पवार गट)
- बारामती – युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार
- पिंपरी – सुलक्षणा शिलवंत (शरद पवार गट) विरुद्ध अण्णा बनसोडे (अजित पवार गट)
- वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे (शरद पवार गट) विरुद्ध सुनील टिंगरे (अजित पवार गट)
- हडपसर – प्रशांत जगताप (शरद पवार गट) विरुद्ध चेतन तुपे (अजित पवार गट)
- अकोले – अकोले भांगरे (शरद पवार गट) विरुद्ध किरण लहामटे (अजित पवार गट)
- कोपरगाव – संदीप वर्पे (शरद पवार गट) विरुद्ध आशुतोष काळे (अजित पवार गट)
- पारनेर – राणी लंके (शरद पवार गट) विरुद्ध काशीनाथ दाते (अजित पवार गट)
- अहमदनगर शहर – अभिषेक कळमकर (शरद पवार गट) विरुद्ध संग्राम जगताप (अजित पवार गट)
- माजलगाव – मोहन जगताप (शरद पवार गट) विरुद्ध प्रकाश सोळंके (अजित पवार गट)
- बीड – संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) विरुद्ध योगेश क्षीरसागर (अजित पवार गट)
- परळी – राजेसाहेब देशमुख (शरद पवार गट) विरुद्ध धनंजय मुंडे (अजित पवार गट)
- अहमदपूर – विनायक जाधव (शरद पवार गट) विरुद्ध बाबासाहेब पाटील (अजित पवार गट)
- उदगीर – सुधाकर भालेराव (शरद पवार गट) विरुद्ध संजय बनसोडे (अजित पवार गट)
- माढा – अभिजीत पाटील (शरद पवार गट) विरुद्ध मीनल साठे (अजित पवार गट)
- मोहोळ – राजू खरे (शरद पवार गट) विरुद्ध यशवंत माने ( अजित पवार गट)
- फलटण – दीपक चव्हाण (शरद पवार गट) विरुद्ध सचिन पाटील (अजित पवार गट)
- वाई – अरुणा पिसाळ (शरद पवार गट) विरुद्ध मकरंद पाटील (अजित पवार गट)
- चिपळूण – प्रशांत यादव (शरद पवार गट) विरुद्ध शेखर निकम (अजित पवार गट)
- चंदगड – नंदिता बाभूळकर (शरद पवार गट) विरुद्ध राजेश पाटील (अजित पवार गट)
- कागल – समरजित घाटगे (शरद पवार गट) विरुद्ध हसन मुश्रीफ (अजित पवार गट)
- इस्लामपूर – जयंत पाटील (शरद पवार गट) विरुद्ध निशिकांत पाटील (अजित पवार गट)
- तासगाव कवठे महाकाळ – रोहित पाटील (शरद पवार गट) विरुद्ध संजयकाका पाटील (अजित पवार गट)