गयाना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. (Photo source- @narendramodi)
Published on
:
20 Nov 2024, 5:38 am
Updated on
:
20 Nov 2024, 5:38 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : डोमिनिका देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला होता. आता गयाना आणि बार्बाडोस या देशांनीही पीएम मोदी यांना त्यांच्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. गयाना देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणार आहे. बार्बाडोसदेखील प्रतिष्ठेच्या ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस पुरस्काराने पीएम मोदींचा सन्मान करणार आहे.
पश्चिम आफ्रिका देशांच्या दौऱ्यावर असलेले पीएम मोदी आज गयाना येथे पोहोचले. याआधी त्यांनी नायजेरिया आणि ब्राझीलचा दौरा केला. त्यांना नायजेरियाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, पीएम मोदी ५६ वर्षांत गयानाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनी पीएम मोदी यांचे विमानतळावर भव्य स्वागत केले.
Guyana and Barbados to confer their top awards to PM Narendra Modi. Guyana will confer its highest national award, “The Order of Excellence” on Prime Minister Narendra Modi. Barbados will confer the prestigious Honorary Order of Freedom of Barbados.
Dominica had also announced… pic.twitter.com/iWRL8Q5PKH
— ANI (@ANI) November 20, 2024