Pune Crime: मुलाच्या डोक्यात दगड मारून खुनाचा प्रयत्न; कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना

1 hour ago 1

मुलाच्या डोक्यात दगड मारून खुनाचा प्रयत्न; कोंढवा परिसरातील धक्कादायक घटनाfile photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Nov 2024, 4:51 am

Updated on

30 Nov 2024, 4:51 am

Crime News Pune: नात्यातील मुलीबाबत अपशब्द वापरल्याने अल्पवयीनांनी शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार टिळेकरनगर कोंढवा बुद्रुक परिसरात तीन दिवसांपूर्वी घडला.

फिर्यादींचा15 वर्षीय मुलगा कोंढव्यातील टिळेकरनगर भागात राहायला आहे. मुलाने शाळेतील मुलीबाबत अपशब्द उच्चारल्याने अल्पवयीन मुले चिडली होती. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास तो शाळेत निघाला होता. टिळेकरनगर परिसरातील आकृती सोसायटीजवळ तीन अल्पवयीनांनी मुलाला अडवले. त्याला शिवीगाळ करून मारहाण केली.

एकाने शाळकरी मुलाच्या डोक्यात दगड मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण करून अल्पवयीन पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करत आहेत.

किरकोळ वादातून गंभीर गुन्हे

अल्पवयीनांमधील किरकोळ वादातून गंभीर गुन्हे घडत आहेत. आठवड्यापूर्वी हडपसर भागातील एका शाळेत वार्षिक समारंभातील वादातून एका वर्गमित्राचा काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता. वर्षभरापूर्वी भवानी पेठेतील एका शाळेच्या आवारात वादातून शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article