पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे विजयी Pudhari
Published on
:
23 Nov 2024, 8:13 am
Updated on
:
23 Nov 2024, 8:13 am
Pune Election Results: पुणे पुढारी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मताधिक्य असलेल्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांनी विजयाची 10320 मतांनी बाजी मारली आहे. तब्बल दहा हजार पेक्षा अधिक मताने ते निवडणुकी विजय झाले आहेत. पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या फेरीपासूनच या मतदारसंघात जोरदार टक्कर झाली. मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर सुनील कांबळे ४२९ मतांनी आघाडीवर होते.
कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २०१४ पासून येथे भाजपचे कमळ फुलले आहे. रमेश बागवे हे काँग्रेसचे अनुभवी नेते होते. त्यांनीही या मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले आहे. तर भाजपचे सुनील कांबळे हे येथील विद्यमान आमदार असून दोघांमध्ये सध्या कडवी झुंज झाली.
सातव्या फेरी अखेर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपच्या सुनील कांबळे यांना 24 हजार 448 मते तर काँग्रेसच्या रमेश बागवे यांना 22 हजार 492 मते कांबळे 1156 मतांनी आघाडीवर होते. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे बाराव्या फेरीअखेर ५५०० मतांनी पुढे होते. तर कांबळे १३ फेऱ्या झाल्या आहेत. सुनील कांबळे साधारण ५००० मतांनी पुढे आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे 17 व्या फेरीत -7500 ने पुढे होते.
१९ वी फेरी अखेर सुनील कांबळे - ७३,०४८ रमेश बागवे - ६३, १२३ कांबळे - ९९२२ मतांनी आघाडीवर होते. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सुनील कांबळे 20. फेरीत - 10320 मतांनी विजयने विजयी झाले. सुनील कांबळे 75726 रमेश बागवे 62470 मत मिळाली. तर 10320 मतांनी कांबळे विजयी झाले.