पुणे जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान; सर्वाधिक मतदानाची कसब्यात नोंद File Photo
Published on
:
20 Nov 2024, 5:15 am
Updated on
:
20 Nov 2024, 5:15 am
Maharashtra Assembly Elections 2024: पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ५. ५३ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७. ४४ टक्के तर पिंपरी मतदारसंघात ४.४ टक्के असे सर्वात कमी मतदान झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात येथे जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. शहरी भागातील ६ हजार ५०० तर ग्रामीण भागातील १ हजार ८०० मतदान केंद्रावर १३ हजर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
२१ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते नऊ पर्यंतचे मतदान
1. जुन्नर : ५.२९ टक्के
2. आंबेगाव : ५.७९ टक्के
3. खेड आळंदी ४. ७१ टक्के
4. शिरूर ४.२७ टक्के
5. दौंड ५. ८१ टक्के
6. इंदापूर ५.५ टक्के
7. बारामती ६.२० टक्के
8. पुरंदर ४.२८ टक्के
9. भोर ४.५० टक्के
10. मावळ ६.०७ टक्के
11. चिंचवड ६.८० टक्के
12. पिंपरी ४.०४ टक्के
13. भोसरी ६.२१ टक्के
14. वडगाव शेरी ६.३७ टक्के
15. शिवाजीनगर ५.२९ टक्के
16. पुणे कॅन्टोन्मेंट ५.५३ टक्के
17. पर्वती ६.३० टक्के
18. कोथरूड ६.५० टक्के
19. खडकवासला ५.४४ टक्के
20. कसबा ७.४४ टक्के
21. हडपसर ४.४५ टक्के