Maharashtra Assembly Elections 2024: पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या आई वडिलांची आणि नातेवाईकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. लोकसभेच्या वेळी कदम यांच्या नातेवाईकांनी मतदानाचा हक्क बजावला होता मात्र त्यानंतर त्यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. नातेवाईक औरंगाबाद या ठिकाणी राहतात.
एकनाथ लाटे स्वाती लाटे नंदा लाटे अशी नातेवाईकांची नावे आहेत. याविषयी अधिक बोलताना ज्योती कदम म्हणाल्या मी माझे नाव कमी करण्याचा अर्ज प्रशासनाकडे दिला होता. मात्र प्रशासनाने आई वडिलांचीच नाव कमी केल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका खुद्द निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कुटुंबीयांना बसल्याने या परिसरात एकच चर्चा रंगली आहे.