Yugendra Pawar Voting: बारामती विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी कुटुंबियांसह कन्हेरी (ता. बारामती) येथे मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांचे वडील श्रीनिवास, आई शर्मिला यांच्यासह मिथिला पवार यांनी येथे मतदान केले. बारामतीकर यंदा परिवर्तन घडवतील असा विश्वास युगेंद्र पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. २८८ मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.
राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.