Maharashtra Assembly Elections 2024: जुन्नर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनी आपल्या कुटुंबियांसह नारायणगाव येथे मतदानाचा अधिकार बजावला. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. २८८ मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.
राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.