Maharashtra Assembly Elections 2024: बावडा (ता. इंदापूर) येथे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) सकाळी सहकुटुंब मतदान केले. यावेळी पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी अंकिता पाटील ठाकरे, मुलगा राजवर्धन पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. या मतदानानंतर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. २८८ मतदारसंघांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.
राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत नागरिकांना मतदान करता येणार आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.