Weather Update News: पुणे,पिंपरी चिंचवड परिसरासह संपूर्ण जिल्ह्या गारठण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भागाचे किमान तापमान 11 ते 12 अंशावर आले होते. दरम्यान आगामी दोन ते तीन दिवसांत जिल्ह्याचे तापमान आणखी कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
नोव्हेंबर महिन्यातील पहिले पंधरा दिवस जिल्ह्यात कुठेही थंडी जाणवली नाही. कारण ढगाळ वातावरणासह काही भागात पाऊस झाला.मात्र गत बारा तासांत वातावरणात बदल झाला अन थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर भारतातून शहरात शीत लहरी येत असल्याने गारठा वाढत आहे.
जिल्ह्याचे किमान तापमान...
एनडीए 11.6, बारामती 11.8, हवेली 11.9, तळेगाव 12, माळीन 12.2, शिरुर 12.4, दौंड 12.6, शिवाजीनगर 12.9, पाषाण 13.3, अंबेगाव 13.3, नारायणगाव 13.4, इंदापूर निमगिरी 13.7, पुरंदर 14.2, लवासा 14.3, राजगुरुनगर 14.6, हडपसर 15.2, भोर 15.3, गिरीवन 15.6, बालेवाडी 15.7, खेड 16, दापोडी 16.7,लोणावळा 18.4