Pusad Assembly Election: उपविभागीय कार्यालयातील सभागृहात विधानसभा निवडणूक 2024 बैठक

3 hours ago 1

पुसद (Pusad Assembly Election) : 16 ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान उपविभागीय कार्यालयातील सभागृहात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 याकरिता 81- पुसद विधानसभा मतदारसंघातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना आचारसंहिता व (Pusad Assembly Election) विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक सर्व विषयाबाबत सदर बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना संपूर्णपणे माहिती देण्यात आली. चार विशेष पथके निर्माण करण्यात आली आहेत. तर चार ऑबजर्व या निवडणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. उमेदवाराला चाळीस लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आहे. त्याचा तंतोतंत हिशोब उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींना नियुक्त केलेल्या पथकांना देणे बंधनकारक आहे.

असं मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीला तहसीलदार महादेवराव जोरवर, कुमरे नप पुसद प्रतिनिधी, (Pusad Assembly Election) निवडणूक विभागाचे लिपिक देवानंद राठोड, नायब तहसीलदार मॅडम इत्यादी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तर राजकीय पक्षाचे पदाधिकारी माधवराव वैद्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष शरद पवार गट, पंजाब भोयर तालुका अध्यक्ष, राजीक देशमुख शिवसेना(उबाठा), जयानंद उबाळे, वंचित आघाडी, बुद्ध रत्न भालेराव वंचित आघाडी, विजय बाबर शिवसेना(उबाठा), रुपेश जाधव भाजप, पंकज वंजारे देविदास डाखोरे राष्ट्रवादी शरद पवार गट पत्रकार दीपक महाडिक हे या बैठकीस उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article