Published on
:
19 Nov 2024, 5:17 am
Updated on
:
19 Nov 2024, 5:17 am
रायगड ः महाराष्ट्र विधानसभेची आदर्श आचार संहिता रायगड जिल्ह्यात गेल्या 15 ऑक्टोबर रोजी लागू झाल्या दिवसापासून 18 नोव्हेंबर पर्यंतच्या कालखंडात जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अमंलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या धडक कारवाईत 48 लाख 46 हजार रुपयांच्या रोख रकमेसह बेकायदा मद्य, अमली पदार्थ आणि मौल्यवान धातू असा एकूण 27 कोटी 43 लाख 83 हजार 704 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आसल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
27 कोटी 43 लाख 83 हजार 704 रुपयांच्या एकूण जप्त मुद्देमालामध्ये 48 लाख 46 हजार रुपयांची रोख रक्कम, 167 कोटी 84 लाख 272 रुपये किमतीचे 2794 कोटी लीटर देशी-विदेशी मद्य, 6 कोटी 97 लाख 33 हजार रुपये किमतीचे 22 किलो 335 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ, 5 कोटी 20 लाख 8हजार 182 रुपये किमतीचे 843 किलो सोन्यासह अन्य मौल्यवान धातू आणि 13 कोटी 10 लाख 11 हजार रुपये किमतीच्या अन्य वस्तू यांचा समावेश असल्याचे जावळे यांनी पूढे सांगीतले.
कर्जत विधानसभा मतदार संघात 11 कोटी 12 लाख 91 हजार 142 रुपयांच्या एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 13 लाखांची रोकड, 38 लाख 38 हजार 860 रुपये किमतीचे मद्य, 8 हजार 100 रुपये किमतीचे अमली पदार्थ, 5 कोटी 20 लाख 8 हजार 182 रुपये किमतीचे सोन्यासह मौल्यवान धातू, आणि 5 कोटी 41 लाख 36 हजार रुपयांच्या अन्य वस्तू यांचा समावेश आहे.
उरण विधानसभा मतदार संघात 6 लाख 82 हजार 653 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 2 लाख 60 हजारांची रोकड, 28 लाख 3 हजार 395 रुपये किमतीचे मद्य, 1 कोटी 4 लाख 40 हजार 275 रुपये किमतीचे अमली पदार्थ, आणि 41 हजार 505 रुपयांच्या अन्य वस्तू यांचा समावेश आहे.
पेण विधानसभा मतदार संघात 35 लाख 88 हजार 600 रुपयांच्या एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 2 लाख 4 हजारांची रोकड, 25 लाख 23 हजार 749 रुपये किमतीचे मद्य, 45 हजार 640 रुपये किमतीचे अमली पदार्थ, आणि 8 लाख 15 हजार 211 रुपयांच्या अन्य वस्तू यांचा समावेश आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघात 22 लाख 40 हजार 935 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 21 लाख 75 हजार 228 रुपये किमतीचे मद्य, आणि 65 हजार 707 रुपयांच्या अन्य वस्तूंचा समावेश आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात 37 लाख 71 हजार 242 रुपयांच्या एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 37 लाख 16 हजार 110 रुपये किमतीचे मद्य, 8 हजार 500 रुपये किमतीचे अमली पदार्थ, आणि 65 हजार 707 रुपयांच्या अन्य वस्तू यांचा समावेश आहे.
महाड विधानसभा मतदार संघात 6 लाख 82 हजार 653 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये 6 लाख 41हजार 148 रुपये किमतीचे मद्य, आणि 41 हजार 505 रुपयांच्या अन्य वस्तूंचा समावेश आहे.
सर्व स्थिर व फिरत्या पथकांना आगामी 48 तासांकरिता अत्यंत दक्षतेने कार्यरत राहाण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघांपैकी पनवेल विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 13 कोटी 85 लाख 11 हजार 477 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सर्वाधिक 30 लाख 82 हजार रुपयांची रोख रक्क्कम देखील पनवेल मध्येच जप्त करण्यात आली आहे. या व्यतिरिक्क्त 10 लाख 86 हजार 237 रुपये किमतीचे बेकायदा मद्य, 5 कोटी 92 लाख 30 हजार रुपये अमली पदार्थ, आणि 7 कोटी 51 लाख 12 हजार 660 रुपयांच्या अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.