Salman Khan : 5 कोटी द्या नाहीतर बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट…सलमानला लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी

2 hours ago 1

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जवळपास आठवडा होत आला आहे. शनिवारी रात्री त्यांची वांद्रे येथे गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रच नव्हे अख्खा देश हादरलाय. सिद्दीकी यांचे बॉलिवूडमध्येही अनेकाँशी सख्य होते. अभिनेता सलमान खान तर त्यांचा खूप जवळचा मित्र. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली. याच लॉरेनस्चे सलमानशी असलेलेल वैरही जगजाहीर आहे. त्यातच सलमानचे खास मित्र असलेल्या बाबा सिद्दीकी यांचीही निर्घृण हत्या झाल्याने तो हादरला असून सलमानच्या सुरक्षेत कडकोट वाढ करण्यात आली आहे.

याचदरम्यान आता एक नवी अपडेट समोर आली आहे. सलमानसोबत असलेले भांडण संपवण्यासाठी लॉरेन्स गँगने 5 कोटी रुपयांची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे 5 कोटींची मागणी करणारा धमकीचा संदेश मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या तर्फे आपण लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचाही दावा करण्यात आला आहे. जर पैसै दिले नाहीत तर सलमानचं नशीब बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट असेल, असा इशाराही मेसेजमधून देण्यात आला आहे. शनिवार 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील निर्मलनगरमध्ये बाबा सिद्दीकी यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

A threatening connection has been received connected the WhatsApp fig of Mumbai Traffic Police, successful which Rs 5 crore has been demanded from histrion Salman Khan. The sender claimed, “Don’t instrumentality it lightly, if Salman Khan wants to enactment live and wants to extremity the enmity with Lawrence Bishnoi,…

— ANI (@ANI) October 18, 2024

वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये 5 कोटींची मागणी करण्यात आली आहे. “हे हलक्यात घेऊ नका ” असा इशाराही या मेसेजमध्ये देण्यात आला आहे.” जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईशी असलेले वैर संपवायचे असेल तर त्याला 5 कोटी द्यावे लागतील” असे धमकीच्या मेसेजमध्ये लिहीण्यात आलं आहे. मात्र या मेसेजमुळे एकच खळबळ माजली असून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींमध्ये चिंता वाढली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article