Sanjay Gaikwad: केंद्रीय मंत्री व भाजपा आमदारावर शिवसेना आमदाराचा हल्लाबोल!

2 hours ago 1

म्हणे सर्व नेत्यांनी विरोधात काम केले

बुलढाणा (Sanjay Gaikwad) : निवडणुकीत आपल्या विरोधात सारेच नेते होते, बुलढाण्यात भाजपानेही आपले काम केले नाही. कार्यकर्त्यांच्या भरोवश्यावर ही निवडणूक मी एकट्याच्या बळावर लढलो. हा झालेला विजय म्हणूनच कार्यकर्त्यांना समर्पीत केला. तुम्हाला सांगतो आमचे केंद्रीय मंत्री अन् भाजपाचे आ.संजय कुटे यांनीही, माझे विरोधात काम केले..असा गौप्यस्फोट संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी करुन, अगदी विरोधी पक्षाचा उमेदवार ठरविण्यापर्यंतही ते सहभागी होते..असेही आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी स्थानिक विष्णुवाडीतील गजानन महाराज मंदीर येथे पुजेचे आयोजन करण्यात आले होते, या नंतर त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत असतांना हा गौप्यस्फोट केला. आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुढे म्हणाले की, आजपर्यंत कुठल्याही आमदाराला शक्य झालं नाही असा अभुतपूर्व विकास आपण बुलढाणा शहर व मतदार संघासाठी केला. त्यामुळे ही निवडणूक आपल्याला अतिशय सोपी जाणार असल्याचे आपण गृहीत धरले होते. पण अगदी कमी मताने आपण निवडणूक जिंकलो.

त्यामुळे सत्कार स्वीकारण्याची आपली मानसिकताच नाही.जीवाचे रान करुन एवढी कामे केल्यावर जर लोकांना एक-एका मतासाठी भीक मागावी लागत असेलतर, लोकशाहीवरचा विश्वास उठतो. म्हणून कार्यकर्त्यांना म्हटलं कामं करुन काही फायदा नाही. ४० हजार लोकांना आपण रक्तदान देतो, रोजच्या १०-१२ डिलेव्हर्‍या करतो. अ‍ॅन्जोप्लॅस्टी, बायपास सर्जरीसाठी रोज मदत करतो. कुणाची मुलगी गेलीतर तिला ८ दिवसाच्या आत आणतो, एवढं करुन आपल्याला या शहरानं दिलं काय? या शहरानं ३-४ हजारानं माग टाकलं. १ हजार कोटीची विकासकामं या शहरात टाकली, महाराष्ट्रात हे शहर चमकायला लागलं. महाराष्ट्रातील लोकांना आश्चर्य वाटतं की हे शहर कस बदललं? पण शहरातील लोकांना काही वाटत नाही.दारु, पैसा, मटन या गोष्टीवर मतदान गेलं.

समजा दुदैवाने मी ८०० मताने पडलो असतोतर तूमचं भविष्य काय होतं? कारण सरकार वर वेगळ व खाली वेगळ, यात अंधाधुंद कारभार माजला असता. एकीकडे जीव तोडून समाजासाठी सर्वस्व ओतणारा सामान्य कार्यकर्ता तर दुसरीकडे फक्त पैशाकरीता लढलेली लढाई व त्यांच्यासोबत लोक गेल्याचं मला खूप नवल वाटतं. अशा जर निवडणुका झाल्यातर विकास करुन माणसानं करायचं तरी काय, असं वाटतं. एवढा प्रचंड मोठा विकास करुन जर लोकांसमोर इतकं झिजावं लागत असेलतर आमदारकी पुढं लढावी की नाही? हाच प्रश्न पडतो. म्हणूनच मी हा शेवटचा कार्यकाळ म्हणून काम करणार आहे, असे त्यांनी सांगून लोकांना विकास व सौदर्यीकरण नको आहे.. फक्त घाणेरडं राजकारण हवं आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

नेत्यांचही बघा, सर्व पक्षाचा एकही नेता माझ्यासोबत नव्हता. भाजपाचा एकही नेता हा सोबत नव्हता, एवढंच काय केंद्रीय मंत्री आमच्या सोबत नव्हते. संजय कुटे व आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधी पक्षाचं तिकीट फायनल केलं, असा आरोप आ.संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी करुन मी करीत असलेली विकासकामे व त्यामुळेचं माझी वाढलेली लोकप्रियता यामुळे त्यांना ज्वेलसी निर्माण झाली असावी..असा संशय त्यांनी व्यक्त केला.

रायमूलकरांचाही गेम झाला..

यानंतर सायंकाळी मोताळा येथे एका प्रभागात एका कार्यक्रमात बोलतांना आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बुलढाण्यातली वक्तव्यांचा पुर्नउच्चार करुन केंद्रीय मंत्र्यांनी मेहकरमध्येही संजय रायमूलकर यांचे काम केले नसल्याचा आरोप केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article