टीम इंडियाचा स्टार बॅट्समन श्रेयस अय्यर याने आयपीएल मेगा ऑक्शन 2025 च्या अवघ्या 24 तासांआधी मोठा धमाका केला आहे. सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबरला मेगा ऑक्शन होणार आहे. श्रेयस अय्यर याने त्याआधी 23 नोव्हेंबरला सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीत स्फोटक शतकी खेळी केली आहे. श्रेयसने हैदराबादमधील जिमखाना ग्राउंड येथे झालेल्या सामन्यात झंझावाती खेळी करत मुंबईला विजयी सलामी मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. मुंबईने श्रेयसच्या नाबाद 130 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 250 धावा केल्या. गोव्यानेही चिवट प्रतिकार करत 220 पार मजल मारली. मात्र त्यानंतर त्यानं फार काही करता आलं नाही. गोव्याला 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 224 धावाच करता आल्या.
मुंबईची बॅटिंग आणि श्रेयसचं शतक
श्रेयस अय्यरने 57 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 10 षटकारांसह 228.07 च्या स्ट्राईक रेटसह नाबाद 130 धावांची खेळी. श्रेयसने फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने 21 चेंडूमध्ये 104 धावा केल्या. श्रेयस व्यतिरिक्त शम्स मुलानी 41, पृथ्वी शॉ 33, अजिंक्य रहाणे 13 आणि अंगकृष रघुवंशी याने 7 धावा केल्या. तर सूर्यांश शेंडगे याने नाबाद 1 धाव केली. गोव्याकडून दर्शन मिसाळ याने दोघांना बाद केलं. तर शुभम तारी आणि हेरंब परब या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्यानंतर गोव्याच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली, मात्र त्यांना मुंबईच्या गोलंदाजांसमोर गोव्याला विजयी करता आलं नाही. गोव्याकडून सूर्यांश प्रभूदेसाई याने सर्वाधिक 52 धावांचं योगदान दिलं. ओपनर इशान गाडेकर याने 40 धावांची खेळी केली. तर विकाश सिंगने नाबाद 47 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कुणालाही मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून 6 जणांनी गोलंदाजी केली. त्यापैकी सूर्यांश शेंडगे आणि रोयस्टन डायस या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, तनुष कोटीयन आणि शम्स मुलानी या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, आंग्रिश रघुवंशी, सूर्यांश शेडगे, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटियन, मोहित अवस्थी, शार्दुल ठाकूर आणि रॉयस्टन डायस
गोवा प्लेइंग इलेव्हन : दीपराज गावकर (कर्णधार), सुयश प्रभुदेसाई, कृष्णमूर्ती सिद्धार्थ (यष्टीरक्षक), रोहन कदम, इशान गाडेकर, दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, विकास कंवर सिंग, अर्जुन तेंडुलकर, शुभम तारी आणि हेरंब परब.