शरयू मोटर्समध्ये करण्यात आलेल्या कारवाईवरून अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
शरयू मोटर्समध्ये करण्यात आलेल्या कारवाईवरून अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. श्रीनिवास पवार अचानक चौकशी कशी झाली यांची इनसाईड स्टोरीच सांगितली. श्रीनिवास पवार म्हणाले, अधिकारी तक्रारदराचं नाव सांगत नाहीत म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून हे झालं आहे आणि त्यांचं नाव ते घेत नाहीत म्हणजे कोण आहे हे तुम्ही ओळखलं पाहिजे. भाजपने हे केलं मी अस म्हणणार नाही मात्र भाजपच्या संगतीत जे गेलेत त्यांनी हे करायला लावलं आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला. पुढे ते असेही म्हणाले, आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. वकिलांकडून चौकशी केल्यावर कळलं की तक्रार आली आहे. आईने मोठ्या बहिणीला काय सांगितलं असेल मला माहिती नाही. मात्र मोठा मुलगा अडचणीत आहे म्हटल्यावर आई बहिणीपाशी काय बोलली असेल मला माहिती नाही, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले. बारामतीकर शरद पवारांवर विश्वास ठेवत युगेंद्र पवार याला निवडून देतील. शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले पैलवान आहेत. युगेंद्र पवार जिंकणार आहेत. लोकसभेला मिळाला तेवढा लीड मिळेल, असं वक्तव्य करत श्रीनिवास पवारांनी विश्वास व्यक्त केला.
Published on: Nov 19, 2024 06:03 PM