परभणी/मानवत (Social media) : सोशल मीडियामुळे जग जवळ आले.दूरवरच्या माणसांचा माणसांशी संपर्क वाढला. परंतू जवळचा दुरावत आहे. कमेंटस्, व्यूहज स्टेटस, लाईक्सला अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या गर्तेत युजर्स अडकत असून, सोशल मीडियावर एखाद्या पोस्टला लाईक्स, कर्मट न मिळाल्यास मनात गुंता वाढत आहे खासकरून तरुणाई या सोशल मीडियाच्या व्यसनात अडकत असल्याने मानसिक आरोग्यासह भविष्यही काळवंडण्याचे धोके वाढत आहेत.
मोबाईल इंटरनेट वेगवान होण्याच्या अगोदर
रिकाम्या वेळेत कुणाकडे तरी जाऊन बसणे व गप्पा मारणे हा बऱ्याच व्यक्तीचा आवडता छंद असायचा. (Social media) ग्रामीण भागात तर दिवसभर पारावर म्हणा किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा एखाद्या मंदिराच्या ओट्यावर गपा मारताना कोणी ना कोणी बसलेले असायचेच. हॉटेल, चहाची टपरी, किराणा दुकानावर कायम एक टोळके गप्पा मारताना दिसायचे. या गप्पा आता कुठेतरी लुप्त होत चालल्या आहेत. गावातील पारावर पूर्वी घरातल्या समस्यांपासून पीक पाणी तसेच थेट देशाच्या राजकारणापर्यंत गप्पा मारल्या जायच्या याच पारावर पूर्वी गावातल्या गावातील समस्या तसेच भांडणांचा न्यायनिवाडाही केला जायचा गावामधील पार आता केवळ कथेतील भाग बनत चालला आहे.
हे पार गावातील ग्रामस्थाला व्यक्त होण्याचे एक हक्काचे व्यासपीठ (Social media) किंवा ठिकाणच होते. जिथे आल्यानंतर गावत काय चालले याची इत्यभूत खबर मिळायची मात्र आता तरूण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त झाली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत जो तो गोबाईलवर वेळ घालवत आहे. त्याच सोशल मीडियाचा वापर वाढल्यापासून अनेकजण मोबाईल हातातून सोडेनासा झाले आहेत. तरूण पिढी तर चोवीस तास मोवाईलमध्ये अडकलेली दिसत आहे. त्यामुळे काळाच्या ओघात पारांवरील गप्पांचे फड लूप्त होत असल्याचे जुने जानकार सांगत आहेत.