Published on
:
27 Jan 2025, 5:05 am
Updated on
:
27 Jan 2025, 5:05 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : कमकुवत कॉर्पोरेट कमाई, अमेरिकेच्या व्यापार धोरणाबाबत अनिश्चितता आणि सतत परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२७) भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ७५,५०० च्या खाली आला. निफ्टी ५० निर्देशांक सुमारे २०० अंकांच्या घसरणीसह २२,८७५ वर व्यवहार करत आहे. विशेषतः आयटी आणि मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
सेन्सेक्सवर झोमॅटो ३ टक्के घसरला. एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, रिलायन्स, इंडसइंड बँक, इन्फोसिस, टीसीएस, एचडीएफसी बँक हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले.
निफ्टी आयटी निर्देशांक १.३ टक्के आणि निफ्टी मेटल निर्देशांक १.७ टक्के घसरला आहे.