विधानसभा-२०१४ मध्ये प्रतिज्ञापत्रात दिली होती माहिती
जेएमएफसी नागपूर न्यायालयाने सुनावणीअंती दाखल केला गुन्हा
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (BJP person Sudhakar Kohle) : दक्षिण नागपूरातील जानकीनगर येथील भूखंड घोटाळा प्रकरणात चर्चेत आलेले भाजप नेते सुधाकर कोहळे (Sudhakar Kohle) यांच्यावर सार्वत्रिक विधानसभा निवडणूक – २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात अचल संपत्तीची माहिती लपविल्याचा आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नागपूर जेएमएफसी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
सध्या कोहळे (Sudhakar Kohle) हे विधानसभा- २०२४ ची निवडणूक पच्छिम नागपूर मतदार संघातून लढवित आहेत. यासाठी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर जेएमएफसी नागपूर १२५ अ, रिप्रेझेंटेशन ऑफ पिपल अॅक्ट- १९५१ अन्वये खटले दाखल असल्याचे म्हटले आहे. प्रतिज्ञापत्रात न्यायालयाच्या नावासह खटला क्रमांक १५४/२०१८ व २२४९/२०१७ असा उल्लेखही केला आहे. याप्रकरणी ते अपिलात गेले आहेत, हे विशेष.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर घाडगे यांनी कोहळे (Sudhakar Kohle) यांच्याविरुद्ध निवडूक आयोगाकडे तक्रार केली होती. याविरुद्ध ते जेएमएफसी न्यायालयात गेले होते. घाडगे यांच्या तक्रारीनुसार, सार्वत्रिक निवडणूक विधानसभा २०१४ मध्ये सुधाकर कोहळे यांनी हेतुपुरस्पर व फसवणूकीच्या उद्देशाने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे.
कोहळे (Sudhakar Kohle) यांनी कलम नं. ७ च्या रकान्यात आदासा येथील अंदाजे ५ एकरची शेती वडिलोपार्जित दाखविली होती, ती संपत्ती वडिलोपार्जीत नसून ती त्यांनी सख्ख्या आईकडून बाजार मूल्यांपैकी अधीक रकम देऊन खरेदी केली होती. या खरेदीचा दस्त नोंदणीकृतीचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालय कळमेश्वर येथे झाला होता. त्याचा दस्त क्र. १३/२०१० दि. ४/१/२०१० असा आहे. अशा प्रकारे आईकडून शेती खरेदीचा नोंदणीकृत व्यवहार केल्यानंतरही कोहळे यांनी प्रतिज्ञापत्रात सदर शेती वडिलोपार्जीत मिळाल्याची खोटी माहिती दिली होती.
एवढेच नव्हे तर विधानसभा २०१४ च्या प्रतिज्ञापत्राच्या पुढच्या रकान्यात चिखली खुर्द, खसरा क्र. १२/२ मध्ये ३००० स्क्वेअर एकूण क्षेत्रफळाच्या भूखंडाचा त्यांनी उल्लेख केला होता. जेव्हा की हा भूखंड २२०० स्क्वेअर फुटाचा असल्याचा विक्रीच्या सौद्याच्या करारनाम्यात उल्लेख आहे. तर विक्रीच्या खरेदी नोंदणीकृत विक्रीपत्रात ३२०० स्क्वेअर क्षेत्रफाळाचा उल्लेख आहे. तसेच या भूखंडाचा कुठलाही कर भरला नव्हता. अशाप्रकारे चर्चेत राहणारे सुधाकार कोहळे हे पश्चिम नागपूर क्षेत्रासाठी ते बाहेरचे लादलेले उमेदवार ठरले असले तरी त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरु आहे.
मनपा निवडणुकीत केला उल्लेख, विधानसभेत टाळला
सुधाकर कोहळे (Sudhakar Kohle) यांनी मौजा चिखली खुर्द खसरा क्र. १५/२, संत ज्ञानेश्वर गृहनिर्माण संस्था येथे भूखंड क्र. ६४, दि. १९/६/२०१० दुय्यम निबंधक क्र. २, दस्त क्र. २५०५/२०१० रोजी स्वतःच्या नावे विकत घेतला होता. हा प्लॉट नगरसेवकाकरीता उभे असतांना मनपा निवडणूक – २०१२ च्या शपथपत्रात दर्शविला होता. मात्र हा प्लॉट नंतर विधानसभा – २०१४ च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दर्शविला नाही. जेव्हा की, या भूखंडावर त्यांचे नावे बिल्डींग परमिट आहे. यावरुन सुधाकर कोहळे यांनी खोटी माहिती देऊन निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप घाडगे यांनी केला. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले.