Published on
:
29 Nov 2024, 10:07 am
Updated on
:
29 Nov 2024, 10:07 am
नागपूर
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. एकीकडे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारला मोठे बहुमत मिळाले. दुसरीकडे विधानसभेत आता विरोधी पक्ष नेता देखील राहणार नाही असे विरोधकांचे संख्याबळ आहे.
त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीतील ईव्हीएमचा घोळ प्रामुख्याने विरोधकांनी लावून धरला आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी सारखी मते, घरच्या व्यक्तींची देखील मते उमेदवारांना न मिळणे, मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या नसताना मतदानाचा टक्का कमालीचा वाढणे अशा अनेक तक्रारी या निमित्ताने विरोधकांकडून पुढे येत आहेत.
काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांनी आता ईव्हीएम हटवा देश वाचवा.. असा नारा दिला आहे. सावनेर मतदारसंघात त्यांच्या पत्नी अनुजा केदार यांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. रविवारी 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नागपुरातील संविधान चौक येथे सुनील केदार यांच्या नेतृत्वात एक बाईक रॅली काढली जाणार आहे. रॅलीच्या माध्यमातून ईव्हीएम हटवा देश वाचवा असा संदेश दिला जाणार आहे.